सर्व कार्यक्रमांचे विडियो अपलोड झाले आहेत आनंद घ्यावा।
सार्वजनिक गणेशोत्सव 2010 सुखरूप , आनंदा नी संपन्न झाला। सगळ्या कार्यकर्त्यांनी जवळ-जवळ महिनाभरापेक्षा जास्त अशी खूप श्रम घेवून कार्यक्रमांना पूर्ण करण्यात भरपूर वेळ, आणि आर्थिक मदद सुद्धा केली। सगळ्या कार्यकर्त्यांनी आप-आपल्यापरीने ज्याला जसे जमेल तसे कार्यक्रमांची शोभा वाढवण्याच्या प्रयत्न केला आणि कार्यक्रमाला यश लाभले। मराठी जगत रतलाम तर्फे संपूर्ण समिति ला हार्दिक शुभेच्छा!
दर वेळे सारखे कार्यक्रमाच्या समाप्ति नंतर त्याची समीक्षा अत्यंत आवश्यक असते, संपूर्ण गणेशोत्सव अर्थात 10-12 दिवसांचे कार्यक्रमांन मधे कोणता कार्यक्रम सर्वात चांगला राहिला आणि का? किंवा कोणत्या कार्यक्रमात काय कमी राहिली, अजून काय करायला हवे होते, आपल्याला त्यातून काय अनुभव प्राप्त झाला, आयोजक म्हणुन पुढे कोणत्या गोष्टींचे लक्ष ढेवायला हवे वगैरे-वगैरे।
मराठी जगत रतलाम तर्फे लोकांशी झालेल्या चर्चे मधुन किंवा सर्वसामान्य लोकांच्या टीका, टिप्पण्या, फोन, ईमेल, एसएमएस लक्षात घेऊन त्यांना संकलित करण्याचा प्रयत्न इथे केला गेला आहे।
1 गणेशोत्सवाच्या आमंत्रण पत्रिकेत श्री गणपति अथर्वशीर्ष देऊन फारच चांगले केले पण अक्षर थोडे अजून मोठे हवे आणि आपल्याला संपूर्ण अथर्वशीर्ष छापायला हवे।
2 आमंत्रण पत्रिकेत सगळ्या कार्यक्रमांची सारणीकृत असे एक पान शेवटी सुद्धा असावे।
3 आमंत्रण पत्रिकेत व्यावसायिकता जरा जास्तच झालाच्ये आढळले।
4 ह्या वेळेस स्थानीय कलाकारांना भरपूर मंच उपलब्ध करून दिला त्यामुळे आपल्या लोकांचे आपल्या समाजाविषयी आकर्षणात नक्कीच वाढ होईल।
5 गणेशोत्सव ह्या नावानी एकुट झालेल्या वर्गणी, दान, विज्ञापन किंवा वेगवेगळ्या प्रकाराच्या राशी मधुन कोणत्याही एका कार्यक्रमावर एकुण प्राप्त झालेल्या राशी चा अधिकतम किती टक्के हिस्सा खर्च करायला हवा? असा विचार सुद्धा लोकांन मधे पडला!
6 संस्थेची आर्थिक मर्यादा व मान लक्षात ठेउन स्थानीय कलाकारांना न्यूनतम किती मानधन द्यायला हवे जेणेकरून त्यांचा उत्साह आणि प्रोत्साहनात वाढ होईल?
7 कार्यक्रम सुरू करण्याच्या वेळे बद्दल (साडे नऊ-दहा वाजेपर्यंत), येणार्या पाहुण्यान कडुन मिळालेल्या टिप्पणी वर लक्ष द्यायला हवे।
8 कार्यक्रमात येणार्या रसिक प्रेक्षकांचा पादुका ठेवण्याच्या व्यवस्थेची सर्वांनी खूब प्रशंसा केली, त्या मुळे मुख्य कार्यक्रम स्थळ स्वच्छ रहाण्यात मदद झाली।
9 महाआरती वगैरे पैक्षा स्थानीय मराठी कलाकारांचा सहयोगा ने आपल्या पारंपरिक आरत्या सुखकर्ता-दुखकर्ता वगैरे जास्त चांगली झाली असती।
10 मराठी भाषेला वाढ देण्या साठी मराठी संस्कृति वर आधारित क्विज किंवा लिखित परिक्षा असे कार्यक्रम करायला हवे।
11 नवीन पिढीचा मुलामुलिंना शास्त्रोक्त पद्धतिने संस्कृत उच्चारण सुधरवण्यासाठी गणपति अथर्वशीर्ष, रामरक्षा, मंत्र पुष्पांजलि वगैरे शिकवण्यास काही कार्यक्रम-प्रतियोगिता करायला हवे।
12 आपल्या कार्यक्रम स्थळावर होणारा आवाज हॉल च्या बाहेर जात नाही ह्या साठी सगळ्या मराठी माणसांना साउंड पोल्युशन न केल्याबद्दल गर्व असाला पाहिजे।
13 कार्यक्रम स्थळावर एक ड्रापबॉक्स ठेऊन त्यात लोकांना कार्यक्रमा विषयी त्यांचे विचार लिहुन टाकता येतील अशी व्यवस्था असायला पाहिजे। ज्यांचा जवळ इंटरनेट ची व्यवस्था आहे त्यांनी सरळ मराठी जगत रतलाम ब्लाग वर आपल्या टिप्पण्या कराव्या। समीक्षा गणेशोत्सव 2010 किंवा कार्यक्रम विशेष च्या खाली दिलेल्या कमेंट लिंक वर क्लिक करून आप-आपली टिपप्णी द्यावी। वर्तमान तांत्रिक युगात ह्या ब्लाग ला एक सार्वजनिक चर्चा पट्ट सारखे समजून आपले विचार सगळ्यांन पर्यंत पसरतील हे लक्षात घेउन ह्याचा भरपूर उपयोग घ्यावा।
ब्लाग विषयी आलेल्या मजेदार टीकांवर पण विशेष लक्ष द्यावे।
14 कार्यक्रमांचा कवरेज ब्लाग वगैरे वर देउन काही उपयोग नाही ही इंग्रज मानसिकता आणि गुलामी चे प्रदर्शन आहे।
15 आजच्या तारखेला आपल्या लोकांपैकी फक्त 50 टक्के लोकांन कडेच कम्प्यूटर किंवा इंटरनेट ची सुविधा आहे तेव्हां उरलेले 50 टक्के लोकांचे काय? म्हणून ब्लाग वगैरे काही कामाची वस्तू नाही।
16 माझ्या नातवानी मला त्याचा लेपटॉप वर ब्लाग दाखवला आम्हाला सर्वांना तो खूप आवडला।
17 आमच्या नातेवाईकांनी पूणे, मुंबई, नाशिक, धार, उज्जैन, भोपाळ, इंदुर आणि अमेरिकेत पण इथले कार्यक्रम बघितले आणि त्यांनी ब्लाग बनविल्या बद्दल विशेष स्वागत केले आहे।
18 ब्लाग बघितल्या वर चमत्कृत झाल्या सारखे वाटले।
19 ह्या आधी सगळे फोटो समाजाच्या आलमारीत बंद असायचे पहिल्यांदा सगळ्यांना ते तेंच्या मनात असेल तेव्हां पहाण्याची सुविधा झाली।
20 माझ्या मुलांचे फोटो आणि विडियो घरच्याघरी डाउनलोड करता आला धन्यवाद मराठी जगत रतलाम।
21 सध्या स्थानीय वर्तमान पत्र जेव्हाँ आपल्या समाजाला जास्त वेटेज देत नाही अश्या वेळेस ब्लाग असल्यानी आपली स्वतंत्र मिडिया व्यवस्था असल्याचा आनंद मिळाला।
22 सगळ्या कार्यक्रमांना व्यवस्थित कवरेज दिला गेला आहे। पण शतरंज स्पर्धा दिसत नाही, असे का?
23 यंदा झालेले 2010 चे कार्यक्रम पहाता-पहाता 2009 चे कार्यक्रम पण परत एकदा पहायला मिळाले।
24 वा फारच छान! आम्ही सध्या रतलाम ला नाही पण हा ब्लाग पाहुन तिथेच कार्यक्रम अटेंड केल्या सारखे वाटले।
25 संपूर्ण मध्यप्रेदशात कोणताही महाराष्ट्र मंडळ अजून तरी इंटरनेट वर इतक्या जोरदार रीतिनी दिसला नाही। हैदाराबाद किंवा बैगलुरू च्या साईट जरूर बघितल्या।
26 रतलाम सारख्या छोट्या जागेला अंतरराष्ट्रीय मंचापर्यंत पोहचवण्याचा आनंद प्राप्त झाला।
27 हळुहळु का होईना पण लोकांचे कम्प्यूटर उपयोग करण्याचे प्रकार वाढतच जाणार आहे तेव्हाँ झालेल्या कार्यक्रमांचे कवरेज त्यांचा सोईने कधीही बघु शकतील।
28 विडियो थोडा हळु चालला आहे त्याला फास्ट करण्यासाठी काय करावे?
29 कम्प्यूटर चे अल्पज्ञान असल्यामुळे टिप्पणी कशी द्यावी हे येत नाही ते कसे करावे? म्हणून फोन वरच शुभेच्छा!!
प्रत्येक पोस्ट खाली कमेंट लिंक वर क्लिक करून आपण निःसंकोच टीप देऊ शकता तांत्रिक मदती साठी संपर्क करावा।
3 comments:
Great Job!
Kulkarni, Jabalpur
Its excelent and gr8 to see everyone's enthusiasm!!!...
खूप सुंदर आहे हो ।
Post a Comment