Wednesday, September 22, 2010

नाटक कालचक्र

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
आज जरा जास्‍तच उशिरा अर्थात जवळ-जवळ रात्री 10 वाजता नाटकाला सुरवात झाली। आणि आजच्‍या प्रयोगानी यंदा च्‍या सगळ्‌या कार्यक्रमांमधे आपले स्‍थान नंबर वन असे सिद्ध केले। एक अत्‍यंत उत्‍कृष्‍ट, अप्रतिम, वर्तमान ज्‍वलंत समस्‍येवर अर्थात वृद्धाश्रम पद्धतिवर आधारित कथा ज्‍याचे लेखन, निर्देशन, मंच सज्‍जा, प्रकाश व्‍यवस्‍था, सर्व पात्रांचा उच्‍च कोटी चा अभिनय असे सगळेच अद्‌भुत असलेले नाटक किती तरी दिवसानी पहायला मिळाले। आज ज्‍या प्रेक्षकांनी कालचक्र नाटक नाही बघितले त्‍यांनी एक सुंदर प्रयोग पहायची संधी गमावली।
ज्‍या आई-वडिलांनी आपल्‍याला लहानाचे मोठे केले, आपल्‍या साठी किती तरी कष्‍ट सहन केले, किती तरी वेळा त्‍यांनी आपल्‍या भावना आवरून मुलांना पाठिंबा दिला अश्‍या आई-वडिलांना त्‍यांच्‍या उतार वयात घराच्‍या एका कोपर्‌यात ठेऊन मुलांनी त्‍यांचाशी केलेला व्‍यवहार आणि अश्‍या परिस्‍थितित बाहेरच्‍या एका अनोळखी  जोडप्‍यानी सून-मुला सारखे राहुन त्‍यांना आई-बाबा म्‍हणून दिलेला साथ असे हृदयाला स्‍पर्श करणारे, मानसशास्‍त्राचे सुंदर चित्रण करणारा प्रयोग इथे संपन्न झाला।
आजच्‍या समाजात जेव्‍हां वृद्धाश्रम एक विकृत सामाजिक आवश्‍यकता होत चालली आहे तेव्‍हां आज आई-वडिलांचे जे वर्तमान आहे ते उद्या आपले भविष्‍य होईल असे समजून ह्या सामाजिक विकृतिला थांबवायलाच हवे असा सामाजिक संदेश देणार्‌या नाटकाच्‍या काही आठवणी खाली सादर करत आहे।
सामाजिक जागृति आणणर्‌या ह्या नाटकाचे प्रयोग अशेच चालु रहावे हीच श्रीचरणी इच्‍छा, 
मराठी जगत रतलाम तर्फे संपूर्ण टीम ला अनेक शुभेच्‍छा!

कालचक्र
प्रस्‍तुति   
अविरत नाट्‌य संस्‍था, इंदुर
लेखक   
श्री जयवंत दळवी
निर्देशक   
श्री राजन देशमुख
पात्र     
श्री उदय इंगळे, श्री राजन देशमुख, सौ․ सीमा देशमुख, शौभा हाँडीयेकर, श्री संजीव इनाळे, अभिजित निमगावकर, पराग कुलकर्णी, अर्चा नांदेडकर,
नैपथ्‍य    
श्री राहुल भराडे,
संगीत   
श्री अभय ताम्‍हणे।

 













No comments: