दिनांक 17 सप्टेंबर 2010
आज संध्याकाळी स्थानीय कलावंताचा एक अत्यंत उत्कृष्ट असा गाण्याचा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला। उपस्थित सर्व श्रोत्यांना तो खूपच आवडला। कित्येक दिवसानंतर सगळ्या स्थानीय कलाकारांना एकत्र एक मंच वर पाहुन उपस्थित श्रोतांबरोबर सगळ्या कलाकारांना सुद्धा खूपच आनंद झाला। कार्यक्रमात सौ․प्रज्ञा लोखंडे, सौ․नीता पाध्ये, सौ․ वंदना जळगावकर, सौ․ मंदाकिनी चितळे, सौ․प्रतिभा पाठक, श्री हेमंत कुलकणी, श्री प्रमोद रामदुर्गेकर, श्री हरीभाऊ राणे, श्री श्रीराम दिवे, श्री श्रीकांत दिवे ह्यांनी वेग-वेगळे रंग प्रस्तुत केले आणि सौ․ माधुरी पुराणिक ह्यांनी एक सुंदर कत्थक नृत्य, सौ․ ज्योत्सना द्रोणकर ह्यांनी तबला वादन प्रस्तुत करून उपस्थित श्रोत्यांना आश्चर्यचकित करून दिले। कार्यक्रम साडे नऊ ला सुरू होउन जवळ-जवळ रात्री साडे बारा पर्यंत चालला।
इतक्या सुंदर कार्यक्रमाचा आयोजना साठी गणेशोत्सव समिति ला मराठी जगत रतलाम तर्फे हार्दिक शुभेच्छा।
1 comment:
Its gr8 like to see it.Gr8 singing by the lady.u must see it.!!!!!!......
Post a Comment