Sunday, September 12, 2010

गणेश स्‍थापना

गणेशोत्‍सव 2010 रतलाम
ठरलेल्‍या प्रमाणे दिनांक 11 सप्‍टेंबर ला संध्‍याकाळी जवळ-जवळ चार च्‍या सुमारास श्रीमति सुधा काळे स्‍टेशन रोड. ह्यांचा घरा पासुन श्रीं च्‍या मिरवणुकीच्‍या कार्यक्रमाची सुरूवात झाली। स्‍टेशनरोड., देना बैंक, गर्ल्‍स कॉलेज, दो बत्‍ती फिरून पुन्‍हा समाजात अश्‍या रीतिने मिरवणुक काढली। पाऊस मिरवणुकीच्‍या एकाध तास अगोदरच झाल्‍या मुळे वातावरण अगदी स्‍वच्‍छ उघडलेले होते। ह्या वेळेस पहिल्‍यांदा स्‍थापनेच्‍या मिरवणुकीचा कार्यक्रम संध्‍याकाळचा ठेवला होता, त्‍या मुळे मिरवणुकीत बरेच जण एकुट झाल्‍याने कार्यक्रमाची शोभा वाढली। कार्यक्रमाचे काही चित्र, आठवणी खाली देत आहे।


Orkut कॉम्‍युनिटी मधे 457001 सर्च करून Join करावे। इतर मराठी मित्रांनाही सूचवावे ही विनंती।








Saturday, September 11, 2010

मराठी जगत रतलाम चा पहिला वाढदिवस आज!


गणेश चतुर्थी निमित्‍य हार्दिक शुभेच्‍छा।
गणेश चतुर्थी 2009 ला मराठी जगत रतलाम ह्या ब्‍लाग ची सुरवात रतलाम ला मराठी माणसांची होणारी चळवळ, विभिन्‍न होण्‍यार्‌या कार्यक्रमांना संपूर्ण विश्‍वाला उपलब्‍ध करून देण्‍याची इच्‍छा ठेऊन केली गेली होती, त्‍यात ह्या ब्‍लाग ला भरपूर यश प्राप्‍त झाले, आणि पहाता-पहाता एक वर्ष पूर्ण झाले। ह्या प्रसंगी आपण सर्वांना पुनः अभिनंदन आणि शुभेच्‍छा! 

                                                                                                           ब्‍लागर अनिल पेंडसे

Friday, September 10, 2010

श्री गणेशोत्‍सव :आमंत्रण पत्रिका

॥ श्री गणेशाय नमः॥
गणेशोत्‍सव 2010 रतलाम
दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा महाराष्‍ट्र समाज रतलाम सार्वजनिक श्री गणेशोत्‍सव] दिनांक 11 सप्‍टेंबर ते 22 सप्‍टेंबर 2010 पर्यंत साजरा करणार आहे। ह्या निमित्‍य वेगवेगळ्‌या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल। कार्यक्रमांची आमंत्रण पत्रिका छापून रतलाम च्‍या मंडळींना वाटल्‍या गेल्‍या आहेत। त्‍या मधे खाली दिल्‍या प्रमाणे विभिन्‍न कार्यक्रमांची सूचना प्रकाशित करण्‍यात आली आहे। आमंत्रण पत्रिकेत व्‍यावसायिकता थोडी ज्‍यास्‍त झाल्‍याचे आढळले तरी सर्व लोकांना आवडले असे श्री गणपति अथर्वशीर्ष आणि अष्‍टविनायक स्‍थळांच्‍या बाबतीत माहिती ह्याचे प्रकाशन। आपल्‍या सर्वांना मराठी जगत रतलाम ब्‍लाग तर्फे गणेश चतुर्थी च्‍या हार्दिक शुभेच्‍छा!

Orkut कॉम्‍युनिटी मधे 457001 सर्च करून Join करावे। इतर मराठी मित्रांनाही सूचवावे ही विनंती।






सामान्‍य ज्ञान क्‍वीज. प्रतियोगिता के नियम

Thursday, September 9, 2010

श्री चिंतामण भावे ह्यांना देवाज्ञा झाली।

स्‍टेट बैंक ऑफ़ इंडिया मधे कार्यरत श्री सतीश भावे ह्यांचे वयोवृद्ध वडिल  
श्री चिंतामण भावे ह्यांना आज सकाळी देवाज्ञा झाली। रेल्‍वेच्‍या डीज़ल शेड विभागातुन सेवानिवृत श्री चिंतामण भावे रतलाम चे जुने राहणारे, विनोदी प्रकृति चे व्‍यक्‍ति होते।
मराठी जगत रतलाम, भावे कुटुंबियांच्‍या दुखाःत सहभागी आहे।
श्री चिंतामण भावे ह्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली।
संपर्क    श्री सतीश चिंतामण भावे
           6 वेद व्‍यास कॉलोनी ‘‘सांई-लीला
          अंकुर हॉस्‍पीटल जवळ रतलाम
          फोन 91-7412-234168  मोबाईल 91-98273-64102