मराठा तेतुका मेळवावा।
एक निवेदनः-
Facebook चे सदस्य बनावे।
http://www.facebook.com/people/MarathiJagat-Ratlam/100002940520670
आपली उपस्थिती दर्शविण्याकरता खाली दिलेल्या कमेन्ट लिंक वर क्लिक करून आपले नाव आणि विचार व्यक्त करावे।
If you are unable to see below MARATHI Text please click on
View menu/ Encoding/ Unicode ( UTF-8)
रतलाम नगर निगम अध्यक्ष श्री दिनेश पोरवालह्यांचाशी मराठी जगत रतलाम ब्लाग तर्फे अनिल पेंडसे ह्यांनी रतलामच्या विकासाबद्दल महत्वपूर्ण बिंदूवर चर्चा करून काही मुख्य मुद्दे त्यांचा लक्षात आणुन दिले। ह्या प्रसंगी रतलाम च्या मराठी भाषी लोकांची यादी " आपुलकीची माणसं "संकलन पण त्यांना भेट देण्यांत आले।
दिनांक 23 मे 2010 रोजी महाराष्ट्र समाज रतलाम ला एक सामुहिक उपनयन संस्कार आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे संयोजक श्री श्रीकांत दिवे ह्यांनी सांगितले की एकुण 9 बटुकांचा यज्ञोपवीत संस्कार इथे झाला त्यात इंदौर चे अर्पित, अपूर्व, मयंक, देवांश, नागदा येथिल समर्थ आणि नाशिक चे बटूप्रसाद कोलांगडे व रतलाम चे वरूण पैठणकर, सचिन सुधाकर ह्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला।
गुरूजीः- श्री मोरेश्वर तुळापुरकर, वासुदेव श्रीधर माळगी, पी․पी․जोशी, कृष्णराव नारळे, अरविंद देव, वसंत रेटरेकर, केशव वाडीकर, दिपक चांदेकर आणि सतीश बुआ ह्यांनी सर्व बटुकांना आपला आशिर्वाद दिला।
महाराष्ट्र समाजाचे अध्यक्ष आणि सचिव ह्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले।