Monday, May 21, 2012

कशी असायला हवी आपल्या समाजाची कार्यकारिणी संरचना।

             सर्वात पहिले आपल्यासर्वांचे अभिनंदन। आपण सर्व एक अत्यंत चांगल्या, शिक्षित समाजाचे सदस्य आहोत। आपल्या समाजात होणार््या  कार्यक्रमांनी आपण इतर समाजांना प्रेरणा देतो ही सुद्धा आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। तसेच आपल्या समाजाचे कार्यकारिणी मंडळ कसे असायला हवे? ह्या साठी, विभिन्न समाजांच्या संरचने ला समजून घेतल्यानंतर, अनेक लोकांशी चर्चा झाल्या नंतर, लोकतांत्रिक पद्धतीनुसार एक नवीन कल्पना आपल्या सगळंयासमोर सादर करत आहे।
            संपूर्ण मराठी जनसंख्येचे कार्यकारिणी मधे प्रॉपर रिप्रेझेंटेशन व्हायला हवे असा लोकतांत्रिक विचार मुळात ठेउन ह्या नवीन कार्यकारिणीची कल्पना केली गेली आहे। प्रत्येक गोष्टींचा बारिकीने विचार करून सगळ्यांचा सहमति ने उपयुक्त निर्णय घ्यायला हवा समाजाच्या प्रत्येक वयोगटाला आणि क्षेत्रीय आधारवर एक सारखे रिप्रेझेंटेशन असून जास्तीत जास्त लोकांना समाजाशी जोडता येईल अशी खात्री आहे।
             समाजाला एक केंद्रीय कार्यकारिणी ची आवश्यकता आहे। ह्या कार्यकारिणी मधे 50 आजीव सभासदांना सर्वसम्मती ने स्थान द्यायला हवे। आपण सर्व ह्या 50 सदस्यांची निवडणूक निम्न पद्धतिने करू शकतो।
                                             समाजाची केंद्रीय कार्यकारिणी मंडळ/समिति
                              वय वर्ष 20-30 चे -- 10 सदस्य (दोन-तीन महिला सदस्य समेत)
                              वय वर्ष 30-40 चे -- 10 सदस्य (दोन-तीन महिला सदस्य समेत)
                              वय वर्ष 40-50 चे -- 10 सदस्य (दोन-तीन महिला सदस्य समेत)
                              वय वर्ष 50-60 चे -- 10 सदस्य (दोन-तीन महिला सदस्य समेत)
                              वय वर्ष 60-70 चे -- 10 सदस्य (दोन-तीन महिला सदस्य समेत)
                             --------------एकुण  50 सदस्य---------------------------
केंद्रीय समिति सदस्यता साठी नियम
  • समाजाचा आजीव सभासद असणे आवश्यक असेल।
  • संपूर्ण समाजात एक व्यक्ति एक पद नियम असेल।
  • एक कुटुंबातला एकच व्यक्ति केंद्रीय समिति मधे राहिल।
  • प्रत्येक वय गटातले सदस्य वेगळ्या-वेगळ्या स्थान-क्षेत्राचे असतील।
  • सदस्याचा किंवा त्याचा कुटुंबाचा समाजाशी कोणत्या ही प्रकार चा व्यावसायिक संबध नसणे।
  • कार्यकाल अवधी मधे त्याची सतत स्थानीय उपस्थिति संभव असेल याची खात्री असणे।
  • प्रत्येक इच्छुक सदस्याचे आवेदनपत्रा बरोबर 20 किंवा जास्त मराठी लोकांचे लेखी समर्थन पत्र। (केंद्रीय सदस्यतेला इच्छुक व्यक्तिनां सोडुन अन्य मराठी लोकांचे समर्थन पत्र घेणे)
  • केंद्रीय समितिच्या कोणत्याही सदस्याची सदस्यता समाप्त करण्या साठी 25 किंवा जास्त लोकांकडुन लेखी समर्थन/सहमति असणे आवश्यक असेल।
  • सामान्य रितिनी केंद्रीय समिति चा कार्यकाल तीन वर्षाचा राहिल।

केंद्रीय समिति चे अधिकार आणि कर्तव्य।
  • केंद्रीय समिति मधे सर्व सदस्यांचा दर्जा समान राहिल (तरी संगळ्या केंद्रीय सदस्याच्या सहमति ने एक सदस्याला केंद्रीय अध्यक्ष व एक सदस्याला केंद्रीय सचिव म्हणून मनोनित करण्यात येईल आणि हे दोन्ही अन्य समाजांसाठी आपल्या समाजाचा अध्यक्ष,सचिव म्हणून रिप्रेझेंटेशन करतील।)
  • मराठी लोकांन कडून कोणत्याही कारणास्तव एकुट होणारा पैसा एकमात्र बैंक अकाउंट मधे ठेवण्यात येईल।
  • सगळे निर्णय केंद्रीय समितिच्या माध्यमानीच घेतले जातील।
  • प्रत्येक निर्णयासाठी 65-प्रतिशत बहुमत असणे जरूरी असेल।
  • प्रत्येक वर्षी एक सर्वसाधारण सभा करणे आवश्यक असेल।
  • विभिन्न प्रकारच्या उपसमिति बनवून त्यांना जबावदारींची वाटणी करणे किंवा त्यांना भंग करणे।
  • एकुण उपलब्ध रकमेतुन सगळ्या उपसमितिंना फंड-बजट उपलब्ध करून देणे।
  • सगळ्या उपसमितींन कडुन आवश्यकतानुसार त्रैमासिक/अर्द्धवार्षिक/वार्षिक  लेखी हिशोब घेणे।
  • विभिन्न उपसमितिंमधे केंद्रीय कार्यकारिणीचा एक मनोनीत प्रतिनिधी ठेवणे।

केंद्रीय समिति विभिन्न उप समिति बनवेल, ज्यात त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष किंवा असले पद वगैरे असून एक केंद्रीय समिति चा केंद्रीय प्रतिनिधि पण असेल उदाहरणार्थ
  • हिशोब रक्षण उप समिति। संपूर्ण समाजा कडुन कोणत्याही कारणाने एकुट झालेल्या पैशाचा हिशोब ठेवणे आणि विभिन्न उपसमितिंना फंड वाटणे, त्यांचा कडुन हिशोब घेणे, आजीव सदस्यांची नोंदणी ठेवणे, सूचनांचा प्रचार-प्रसार पहाणे, सरकारी/गैरसरकारी नियमानुसार आवश्यक तथ्य संभाळणे वगैरे।
  • वास्तु रक्षण उप समिति। मराठी लोकांच्या विभिन्न वास्तुंचे रक्षण अर्थात नवीन वास्तु विकत घेणे, वर्तमान वास्तुंना संभाळणे किंवा विकणे, पुर्ननिर्माण किंवा जनरल मेंटेनंस, सरकारी/गैरसरकारी नियमानुसार आवश्यक तथ्य संभाळणे वगैरे।
  • सांस्कृतिक आयोजन उप समिति। विभिन्न प्रकार चे धार्मिक किंवा सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे। जसे गणेशोत्सव, मुंज, व्याख्यान वगैरे।
  • शिक्षण उप समिति। शाळा, शिक्षण संस्था ह्या संदर्भात विभिन्न प्रकारचे सरकारी/गैरसरकारी नियमानुसार आवश्यक तथ्य संभाळणे।
  • महिला मंडळ उप समिति। महिला सदस्यांशी संबंधित विभिन्न कार्यक्रम करणे।
  • भजनी मंडळ उप समिति। आपल्या नावाप्रमाण आपले कार्य करेल।

अश्यारीतिने अनेक उपसमितिंचा निर्माण केला जाईल। सगळ्या उपसमिति केंद्रीय समितिला जवाबदार असतील।



            एकमतानी निष्पक्ष चुनाव अधिकारी ची नेमणुक करून, केंद्रीय समिति मधे येण्यासाठी प्रत्येक इच्छुक व्यक्तिला इतर 20 किंवा जास्त मराठी लोकांन कडून लिखित सहमति पत्र घ्यावे लागेल। अश्या सर्व इच्छुक लोकांचे आवेदन सहमति सकट एकुट झाल्यानंतर ज्यास्तितजास्त सहमतिवाल्या लोकांना केंद्रीय समिति मधे वयगट/क्षेत्र अनुरूप सदस्यता देण्यात येईल।
            केंद्रीय समितिनी मूर्तरूप घेतल्या नंतर प्रत्येक उपसमिति साठी सदस्य होण्या करता अन्य मराठी लोकांचे आवेदन साध्या कागदावर स्वीकारले जातील त्यांना सुद्धा कमीत कमी दहा लोकांचे सहमति पत्र देणे जरूरी असेल (त्यांचे आजीव सभासद असणे जरूरी नसले तरी आजीव सभासदा ला जास्त प्रायोरिटी राहील) त्यानंतर त्या नांवांवर केंद्रीय समिति निर्णय घेउन प्रत्येक उपसमिति बनवेल। व त्या उपसमिति चे सदस्य बनवल्या नंतर ते सदस्य आपसात आपआपल्या उपसमिति चे अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे जवाबदारी स्वतः ठरवतील। कोणत्याही व्यक्ति ला फक्त एकच उपसमिति मधे सदस्य करण्यात येईल। लीगल पाइंट ऑफ व्यू नी उपसमिति वेगळ्या नावानी रजिस्टर्ड असली तरी सुद्धा त्याला केंद्रीय समिति ला सामाजिक स्तरावर जवाबदार असणे जरूरी असायला हवे। कोणत्याही उप समिति मधुन कोणत्याही सदस्याची सदस्यता समाप्त करण्याचा अधिकार केंद्रीय समिति ला असेल।
              अश्या  रीतिने आपण जास्तित जास्त लोकांना पद देउन त्यांचा सम्मान करून आजीव सदस्यांची संख्या वाढवू शकतो। आणि कोणत्याही प्रकारचा निर्णय सार्वजनिक/लोकतांत्रिक असेल ह्याची समाजाला खात्री देउ शकतो।
               उपरोक्त पत्र मात्र एक वैचारिक मंथन असून समाजासाठी माझ्या समेत अनेक लोकांच्या मनाची कळकळ आहे। सगळ्यानी आपल्या विवेक अनुरूप निर्णय घेउन समाजाला एक नवीन दिशा आणि उत्साह द्यावा ही अपेक्षा। समाजाच्या उन्नति साठी सतत प्रयत्नशील। आभार
ह्या बाबतीत आपले विचार फेसबुक किंवा पोस्ट खाली किंवा  व्यक्तिगत जरूर द्यावे ही अपेक्षा।

फेसबुक वर पण उपलब्ध आहे   आज पर्यंत चे टोटल व्यूज 15147.

आपला                                23/05/2012 
अनिल पेंडसे
525 काटजू नगर, पानी की टंकी के सामने,
रतलाम (म.प्र.) 457 001
फोन 07412.232095,  94251.03895 
Email         :- anil.pendse.rtm@gmail.com
Blog           :- http://marathijagatratlam.blogspot.com/

1 comment:

Anonymous said...

विचार खूब छान आहे .पण एक विचारणीय गोष्ट हे आहे कि एवढ्या समिती साठी कार्य कर्ता मिळतील का ?
समाजा ची एकेता च्या गोष्टी करताना समाजात जे काही साधारण सभेत घडले ते पाहून फार धक्का
बसला . निवदुनिकी साठी तयार न होता एका नावा वर सर्व सन्मति साठी जे काही घडले त्यात समाजा
ची कोणची एकेता समोर आली ,हे सर्व साधारण ला कलालीच असेल ,सर्व सन्मति च्या नावा वर मारून -
मुटकून मुसलमान बनवावं त्यात काय अर्थ आहे . तरी निष्पक्ष नीवदुनिक अधिकारी मूळे समाजा पुढे एक
नवीन मिसाल बघण्यात आली त्यांचे शत शत आभार ..................