Tuesday, June 14, 2011

काही मजेशीर व्याख्या

FW काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.
बघा आवड्तायेत का?

अनुभव
- सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह
- जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी
- तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू
- वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व
- मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक
- चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फ्याशन
- शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक/ब्यांक्बुक
- जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)
ग्यालरी
- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी
- एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री
- एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज
- शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा
- ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा
- पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती
- दोन महायुद्धांच्या मधला काळ
दाढी
- 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप
- आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर
- कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य
- पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे
- नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन
- साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य
- कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस
- जन्मठेपेचा कैदी
विधुर
- जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा
- चालतं बोलतं atm कार्ड
श्रीमंत बायको
- अचानक लागलेली लॉटरी
IT वाला
- सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली
- श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी
- ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ
- बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साध?
लग्नाचा हॉल
- दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना
मिसळपाव.कॉम
- जगातील सर्व 'नमुन्यांचे' एकत्रित पणे टेस्टिंग करणारी प्रयोगशाळा

No comments: